Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात आजपासून 'स्वच्छ जल से सुरक्षा' अभियान

जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जलजीवन मिशनच्या (Jaljivan Mission )माध्यमातुन स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित पुरवठा व्हावे ,या उद्दात हेतुने १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा”(Swachha Jal Se Suraksha) हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

- Advertisement -

दुषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजार पसरु शकतात. पाण्याची गुणवत्ता राखणे हि सर्व ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांनी दिलेल्या सुचनानुसार १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असुन त्याचे रिपोर्ट ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल अँप द्वारे अस्तित्वातील सर्व पाणीपुरवठा योजना, रेट्रो फिटिंग मधील पाणीपुरवठा योजना व नवीन योजना तील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधी मधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व पाणी नमुने जल सुरक्षा का मार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानात वरिष्ठ वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी सर्व पाणी नमुन्याची तपासणी करावी, रेट्रो फिटिंग, नवीन योजनातील स्त्रोतांची जिओ टॅगिंग ग्रामीण पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता यांनी करावे. पाणी नमुन्याचे संकलन जल सुरक्षकांनी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

याबाबत वरिष्ठ भु वैज्ञानिक, कार्यकारी अभियंता,गटविकास अधिकारी, उप अभियंता यांना समन्वयातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची महिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या