Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रस्वाभिमानीचा रविकांत तुपकरांना अल्टीमेटम; पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला निर्णय

स्वाभिमानीचा रविकांत तुपकरांना अल्टीमेटम; पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला निर्णय

पुणे | Pune

मागच्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sagnhtana) अल्टिमेटम दिला आहे. १५ ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांनी आपली बाजू मांडावी, अशा सुचना स्वाभिमानी संघटनेने रविकांत तुपकर यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये रविकांत तुपकर यांच्याबाबत चर्चा झाली. या बैठकीला राजू शेट्टींसह (Raju Shetti) सर्व नेते उपस्थित होते. मात्र रविकांत तुपकर यांनी उपस्थिती लावली नाही.

Supriya Sule : “पार्टी विथ डिफरन्स कुठे गेलं? भाजपने ९ वर्षांत…”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

१५ ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांना समिती वेळ देत आहे. त्यांनी आपल म्हणणे समितीसमोर नोंदवावे म्हणजे समितीला निर्णय घेता येईल. तुपकरांनी भूमिका मांडली नाही तर समिती निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविकांत तुपकर प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शिस्तभंग समिती नेमली होती. समितीने यावर आज राजू शेट्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण घेतेल. पण तुपकर या बैठकीला आले नाहीत.

भाजप नेत्याची काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका, म्हणाले, “तुम करो तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला…”

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, ‘रविकांत तुपकर यांची भूमिका संघटनेसाठी हानिकारक होती. त्यांनी या बैठकीला येणे अपेक्षित होते. शिस्तपालन समिती समोर मी तुपकर यांच्या आरोपाचा खुलासा केला. आता समितीकडे निर्णय सोपवला आहे. निर्णय प्रक्रियेत मी सहभागी होणार नाही.’

रविकांत तुपकर यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आहेत. तो सगळा वाद केवळ बुलढाण्यातला आहे. आज राज्यातले सगळे संघटनेचे प्रमुख नेते इथं आहेत. या सगळ्या नेत्यांनी शेट्टीसाहेबांनी विचारले की, तुपकर यांनी केलेल्या आरोपांवर तुमच काय म्हणणे आहे?, असे जालिंदर पाटील यांनी सांगितले.

“आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही”; श्रीकांत शिंदेंचे टीकास्त्र

तसेच, ‘तुपकरांना १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. समितीसमोर त्यांना म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. तुपकरांनी चळवळीसोबत राहावे. आईच्या ममतेने राजू शेट्टी आरोप, चुका पोटात घालायला तयार आहेत. राजू शेट्टींवर आरोप केल्याशिवाय राज्यात मोठे होता येत नाही. तुपकरांनी समितीसमोर भूमिका मांडावी. भूमिका मांडली गेली नाही तर समिती निर्णय घेईल.’, असे जालिंदर पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या