ऊसाला वाढीव भावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ( Swabhimani Farmers Association) गुरुवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadwa Cooperative Sugar Factory) गेटवर ऊस (sugar cane) रोखणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी या आंदोलनास उपस्थित राहणार आहे…

दि. १५ ऑक्टोबरला २१ वी ऊस परिषद (Sugarcane Council) जयशिंगपूर येथे झाली. यामध्ये एक रकमी एफ आर पी अधिक ३५० रुपये वाढीव भाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितला. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या वजनात काटेमारी केली जात आहे. या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आवाज उठवला.

महाराष्ट्रातील संपूर्ण साखर कारखान्यांचे काटे हे ऑनलाईन झाले पाहिजे.यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा निघाला. या मोर्चाचा धसका घेऊन साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला.परंतु,एक रक्कमी एफ आर पी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांची एकजूट दाखवणे गरजेचे आहे. म्हणून १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन (Movement) करण्यात येणार आहे.

कोल्हापूर प्रमाणे पहिली उचल किमान ३००० रुपये महाराष्ट्रातील उर्वरित शेतकऱ्यांना हवी असेल व एकरकमी एफ आर पी अधिक ३५० रुपये भाव हवा असल्यास  स्वाभिमानीच्या या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.दि.१७ आणि १८ तारखेला राज्यातील सर्व साखर कारखाने स्वतः उत्स्फूर्त बंद करावे,असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी नाशिकसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केले आहे.  

आंदोलनात असणाऱ्या मागण्या केंद्र सरकार व काही मागण्या राज्य सरकार यांच्याशी संबंधित आहे. जर आपण शेतकऱ्यांनी एकत्रित ताकद दाखवली तर निश्चितपणे या मागण्या मान्य होतील. म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या ऊसतोड आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आज कोल्हापूर मधील साखर कारखाने हे तीन हजाराच्या आसपास पहिली उचल तोडणी वाहतूक वजा जाता देत आहे आपल्याकडे मात्र तो भाव २५०० रुपयापेक्षा कमी आहे. आपल्याला ही कोल्हापूरप्रमाणे भाव हवा असेल तर नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संघटित होणे आवश्यक आहे. या आंदोलनात आपण सक्रिय सहभागी व्हावे. ऊस तोड स्वतः दोन दिवस बंद करावी.

संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत…

१) सन २०२१-२२ हंगामात गाळपास गेलेल्या उसासाठी एफआरपी अधिक २०० रूपये अंतिम भाव मिळावा. व राज्या सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत.

२) राज्य सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अद्यादेशमध्ये केलेली दुरूस्ती त्वरीत मागे घेऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा दुरूस्ती करून एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उताऱ्याच्या आधारावर या सिझन मध्ये म्हणजेच सन २२-२३ च्या हंगामामध्ये एकरकमी एफआरपी द्यावी.

३) ऊस तोडणी मजूर हे स्वर्गीय गोपीथ मुंडे महामंडळामार्फतच मजूर पुरवावेत. जोपर्यंत हा निर्णय होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून अथवा कारखान्याकडून महामंडळाने वर्गणी वसुल करू नये

४) केंद्र सरकारने ६० लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिलेली आहे. अजून तीस लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी. तसेच निर्यातीस कोटा सिस्टिम न लावता ओपन जनरल लायसन (ओजीएल) अंतर्गत जे पहिले निर्यात अतील त्यांना यात यावे. सरकारने दिलेला कोटा संपेपर्यंत मुक्त परवाना द्यावा.

(५) केंद्र सरकारने साखरेची किंमत ३५०० रूपये प्रतिकिंटल निश्चित करून इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर ५ रूपयांची वाढ करावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *