Friday, April 26, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बसवंत येथे स्वॅब संकलन केंद्र सुरु

पिंपळगाव बसवंत येथे स्वॅब संकलन केंद्र सुरु

पिंपळगाव बसवंत | Pimpalgoan Baswant

पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे करोना व्हायरस स्वॅब संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे.

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना व्हायरस स्वॅब संकलन करण्यात येणार आहे.सदरील चाचणी केवळ 1100 रुपयात उपलब्ध होणार आहे. संबंधिताना सोबत आधार कार्डची सत्यप्रत लागणार आहे.

परिसरातील करोना व्हायरस सदृश्य रुग्णांसाठी ही सुविधा केली आहे. तरी करोना विषयक लक्षणे आढळली तर संबंधितानी लवकरात लवकर या संकलन केंरावर येऊन कोरोना व्हायरसचे अचूक निदानासाठीची RT-PCR चाचणी करून योग्य ते उपचार करावेत. असे आवाहन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी केले आहे.

संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करोना व्हायरस स्वॅब संकलन केंद्राचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या