Monday, April 29, 2024
HomeनाशिकNashik News : नाशिक कृउबा समिती सचिवांच्या निलंबनाचे आदेश

Nashik News : नाशिक कृउबा समिती सचिवांच्या निलंबनाचे आदेश

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

राज्याचे सहसचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांनी कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) सचिव (Secretary) अरूण काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक कृउबा समितीचे वादग्रस्त सचिव अरुण काळे (Arun Kale) यांना खातेनिहाय चौकशी होईपर्यंत निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिक कृउबा सचिवपदाची धुरा ही सहायक सचिव प्रकाश घोलप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे….

- Advertisement -

Nashik News : चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून २५० कोंबड्यांचा मृत्यू

नाशिक कृउबा समिती येथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पदावरून निलंबन करण्यात आल्याचा आदेश नाशिक कृउबा समितीचे सभापती देविदास पिंगळे (Chairman Devidas Pingale) यांनी काढले आहेत. नाशिक जिल्हयातील दोनशे शेतकऱ्यांच्या (Farmer) टोमॅटो खरेदी प्रकरणात १९८ शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक (Fraud) प्रकरणाबाबत तेथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून आपल्यामार्फत खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते.

नाशिक कृउबा समितीमधील तत्कालीन संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन पणनमंत्री यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी (Inquiry) होऊन कायदेशीर कारवाईबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने नाशिक कृउबा समितीला अहवाल सादर करण्याबाबत निर्देश तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी दिले होते. परंतु, नाशिक कृउबा समिती यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही ही बाब गंभीर आहे.

Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

त्याचप्रमाणे नाशिक कृउबा समिती यांनी सादर केलेला खुलासा शासन स्तरावरून अमान्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे काळे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व खातेनिहाय निष्पक्ष चौकशी करुन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते. त्यामुळे नाशिक कृउबा समिती सभापती देविदास पिंगळे यांनी खातेनिहाय चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश पारित केले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Rs 2000 Notes : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत बँकेत भरता येणार

बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. सचिवाने कामकाज बघत असताना शेतकऱ्याचे हित लक्षात घेत बाजार समिती हिताचे काम करणे अपेक्षित असते. परंतु, काळे यांनी गंभीर स्वरूपाच्या चुका केल्याने ते कारवाईस पात्र झाले आहेत. तसेच शेतकरी, माजी संचालक यांनी देखील तक्रारी केल्या होत्या. राज्य शासनाने कारवाई करण्याचे आदेश केले होते. त्याप्रमाणे झालेल्या वार्षिक सभेत ठराव देखील संमत करण्यात आला आहे.

देविदास पिंगळे, सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती नाशिक

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची बाजू ठेवणे जेवढे महत्वाचे तेवढेच व्यापाऱ्यांची बाजू ठेवणे महत्वाचे आणि गरजेचे आहे. कामकाज करत असतांना समितीची जबाबदारी ही सचिव आणि सभापतींची असते. सर्व निर्णय दोघांच्या संमतीने घेतले जातात. शेतकऱ्यांनी चोवीस तासात आपली तक्रार बाजार समितीला सांगणे गरजेचे असते.

शिवाजी चुंभळे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या