Thursday, April 25, 2024
Homeजळगावकाँग्रेसच्या निलंबित पदाधिकार्‍यांनी घेतली नाना पटोलेंची भेट

काँग्रेसच्या निलंबित पदाधिकार्‍यांनी घेतली नाना पटोलेंची भेट

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

जिल्हा बँक निवडणुकीत पक्षशिस्त भंग (Breach of party discipline) केल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेले काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव (Former Congress state secretary) डी. जी. पाटील (D. G. Patil) यांनी नुकतीच प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले (State President MLA Nana Patole) यांची मुंबई येथे भेट घेत आपली बाजू मांडली. दरम्यान आता प्रांताध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे काँग्रेस पदाधिकार्‍यांचे लक्ष लागुन आहे.

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Co-operative Bank) निवडणुकीत (election) महाविकास आघाडी पॅनल विरोधात भाजपाला (bjp) सोबत घेत पॅनल उभे करून पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका जिल्हा काँग्रेसने (Congress) ठेवला होता. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील, ज्येष्ठ नेते राजीव पाटील आणि अरूणा दिलीप पाटील यांच्यावर कारवाई (Action) करावी अशी शिफारस जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आली होती.

त्यानुसार प्रदेश काँग्रेसने गंभीर दखल घेत डी. जी. पाटील, अरूणा पाटील आणि राजीव रघुनाथ पाटील यांना दि. 4 मार्च रोजी पक्षातुन निलंबीत (Suspended) करण्याचे आदेश बजावण्यात आले होते. या आदेशानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान डी. जी. पाटील यांनी या कारवाईप्रकरणी आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यावर गटबाजीचा आरोप केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले होते.

प्रांताध्यक्षांना घातले साकडे

काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी शिष्टमंडळासह नुकतीच प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी त्यांची बाजू मांडत निलंबनाची कारवाई मागे घ्यावी असे साकडे घातल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता प्रांताध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी अ‍ॅड. अविनाश भालेराव, भगतसिंग पाटील, अल्ताफ खान, हितेश पाटील आणि दोन महिला पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या