डांभूर्णीसह भोकर येथील खुनाचा संशयित आरोपी  गजाआड

जळगाव  – 

डांभुर्णी (ता.यावल) येथील  कैलास चंद्रकांत कोळी (वय १६) या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी यश पाटील (वय २६ रा. डांभुर्णी) या संशयित आरोपीस पकडले. या आरोपीनेच तालुक्यातील भोकर येथील अल्पवयीन तरुणाचाही खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

संशयित आरोपी यश पाटील हा मुलांना आमीष दाखवून त्यांंना  निर्मनुष्य जागी किंवा शेत अथवा जंगलात घेवून जात होता आणि त्या मुलांसोबत तो अनैसर्गिक कृत्य करायचा. त्यानंतर तो त्या मुलांचे डोळे फोडायचा. डांभुर्णी, भोकर येथील घटनेअगोदरही त्याने त्याच्याच गावातील एका मुलाच्या डोळ्यात काड्या खुपसल्या होत्या.

या घटनेच्या पार्श्‍वभूमीच्या संशयावरुन  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला शनिवारी सकाळी डांभुर्णी शिवारातील शेतात पकडले होते. याबाबत कळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता.

त्यामुळे पथकाने आरोपीस यावल पोलिसांच्या ताब्यात न देता थेट जळगावात आणले. परंतु, डांभुर्णीतील मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग करुन त्यांना ममुराबाद बसस्थानकाजवळ अडवले. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. परंतु, आरोपी ज्या वाहनात होता, ते वाहन अगोदर जळगावला पोहचले होते.

भोकरलाही खून

भोकर येथील अकरा वर्षीय राहुल नवल सैंदाणे याचा १२ मार्च रोजी खून झाला होता. या प्रकरणाचा काहीही तपास लागत नव्हता. पण, डांभुर्णी येथील खून प्रकरणातील संशयित आरोपीनेच भोकरी येथील मुलाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *