Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या जागांचे सर्वेक्षण तात्काळ करावे

जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या जागांचे सर्वेक्षण तात्काळ करावे

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या जागांचे सर्वेक्षण करून जागा विकसित करण्यासाठी नेमलेल्या समितीकडे तत्काळ अहवाल द्यावेत,असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले.

- Advertisement -

समितीची बैठक गुरुवारी (दि.१७)अध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीस उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, सभापती सुरेखा दराडे, अश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, संजय बनकर, सदस्य महेंद्र काले, भास्कर गावित, छाया गोतरणे, किरण थोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे उपस्थित होते.

बैठकीत भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी जि.प.च्या स्वनिधी (सेस) वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले होते.त्यावर झालेल्या चर्चेनंतर वरील आदेश देण्यात आले. करोना संकटामुळे राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने स्वमालकीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जागांचे सर्वेक्षण करून जागा विकसित करण्यासाठी नेमलेल्या समितीकडे तत्काळ अहवाल देण्याचे आदेश अध्यक्ष क्षिरसागर यांनी दिले.

बैठकीत भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी जि.प.च्या स्वनिधी (सेस) वाढीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. करोना संकटात सेस कमी झाल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर झाला. यासाठी जि.प.च्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. याचे पुढे काय झाले, अशी विचारणा करीत कायमस्वरूपी सेस वाढीसाठी धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

जिल्हाभरात मोक्याच्या अनेक जागा जि.प.च्या आहेत. त्या विकसित केल्यास कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. पुणे जिल्हा परिषदेने स्वमालकीच्या जागा विकसित केलेल्या असल्याने, त्यांना शासन निधीवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचे सविता पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जि़प़च्या स्वमालकीच्या जागा विकसित करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम होत असलेल्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स करावे, असा ठरावही यावेळी झाला. जागा विकसित करण्याबाबत समिती नियुक्त केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. समितीने सर्व जागांचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश अध्यक्ष क्षिरसागरयांनी दिले.

बांधकाम विभाग अंतर्गत ३०५४ व ५०५४ लेखाशीर्षाखालील निधी नियोजनाबाबत यतिन कदम यांनी विचारणा केली. या निधीचे दीडपटीने नियोजन केले जाणार असल्याचे बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी सांगितले.रस्ते दुरुस्ती निधीचे भौगोलिक क्षेत्रानुसार वाटप करण्याची मागणी डॉ. कुंभार्डे यांनी केली. यावर शासन आदेशाप्रमाणे नियोजन केले जाईल, असे बनसोड यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या