Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसुरगाणा पॅटर्नची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाला पाठवणार

सुरगाणा पॅटर्नची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाला पाठवणार

नाशिक | प्रतिनिधी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार ( Dr Bharati Pawar, Union MoS for Health and Family Welfare) यांंना नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव (Vaidya Vikrant Jadhav) यांनी कोरोनावरील उपचाराचा सुरगाणा प्रकल्प (Covid treatment surgana pattern) सादर केला. तो प्रकल्प आयुष मंत्रलयात (Ministry of. Ayush) पाठविणार असल्याचे डॉ. पवार यानी यावेळी स्पष्ट केले. मे-जून महिन्यात आदिवासी बांधावांच्या आरोग्य प्रस्थापनेसाठी अभ्यास करून आयुर्वेद औषधांनी आरोग्य ,कॉविड रुग्णांना साठी विशेष आरोग्य प्रस्थापेनेसाठी प्रकल्प राबवण्यात आला…

- Advertisement -

हा प्रकल्पाला आदिवासी बांधवांनी प्रतिसाद देऊन आयुर्वेद, वनस्पतीजन्य औषधांना आपलेपणाने सेवन करून ,आरोग्य प्रस्थापित होण्यास मदत झाली .हा प्रकल्प आयुर्वेद शास्त्राचा वापर केलेला उत्तम उद्धारण ठरले.

मुळ सैद्धांतिक औषंधांना आयुर्वेद भारतीय मुल शास्त्राची जोड दिल्याने आरोग्य प्रस्थापित अधिक गतीने होते हे सिद्ध झाले कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी वैद्य जाधव यांनी मोफत आयुर्वेदिक उपचार पद्धती राबवली.

त्यास चांगले यश मिळाले. हा प्रकल्प वैद्य विक्रांत जाधव यांनी नुकताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना सादर केला. हा प्रकल्प आयुष मंत्रालयाला (Ministry of Ayush) पाठवण्याची ग्वाही डॉ भारती पवार यांनी दिली. उपचारासाठी वापरण्यात आलेली औषधे, आदिवासी बांधवांकडून मिळालेला प्रतिसाद, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी-आरोग्य कर्मचारी यांनी उपचारासाठी घेतलेला पुढाकार, उपचाराला मिळालेले यश अशी सारी माहिती वैद्य विक्रांत जाधव यांनी डॉ भारती पवार यांना सांगितली. (Dr Bharati Pawar)

तसेच कोरोना रुग्ण आणि पोस्ट कोविड (Covid Treatment) यासंबंधीचे केस स्टडी डॉ भारती पवार यांना त्यांनी सादर केली. चर्चेवेळी डॉ भारती पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील नोंदणीची माहिती जाणून घेतली. औषधे आणि रुग्णांचा प्रतिसाद कोरोना वरील उपचारात टप्पेनिहाय वापरलेली औषधे आणि त्यास प्रकृती सुधारणेतुन रुग्णांकडून मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचे अनुभव विस्तृत आकडेवारीसह माहिती डॉ. पवार यांना वैद्य जाधव यांनी दिली.

आयुर्वेदातील सैद्धांतिक ग्रंथ मधील अवस्था अनुरूप निवेद केलेली औषध ह्या प्रकल्पात वापरली गेली,त्याचा वापर आयुर्वेद शास्त्र लक्षण, अवस्था अनुरूप असंख्य वर्ष पासून यशस्वी वापर करीत आहे . आदिवासी बांधवांसाठी नाशिक जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम राबविला, असे डॉ भारती पवार म्हणाल्या. तसेच आदिवासी बांधवांना मदत केल्याबद्दल डॉ भारती पवार यांनी वैद्य विक्रांत जाधव यांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या