सुरगाणा : मनखेड येथील १२ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

मनखेड । प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील मनखेड येथील गौरव विलास गायकवाड (१२) या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या पालकांनी सकाळी ७:३० वाजता मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोषकुमार आडे यांनी तपासले असता रक्तश्राव चालू असल्याने ड्रेसिंग करून पुढील उपचारासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास पाठवले.

परंतु दुर्दैवाने वाटेतच सव्वाआठच्या सुमारास गौरवचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनखेड गावात तणाव निर्माण झाला. मुलाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मुलावर वेळेत उपचार न केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार विजय सूर्यवंशी, तालुका आरोग्य धिकारी डॉ. दिलीप रणवीर, सुरगाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवानशिंग वसावे, बा-हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नागरिकांची आक्रमकता लक्षात घेता शिवसेना उप जिल्हाप्रमुख योगेश वार्डे, शिवसेना तालुकाध्यक्ष मोहन गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील भोये मनोहर जाधव हेही घटनास्थळी आले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेची शहनिशा व कार्यवाही आठ दहा दिवसात करण्याचे आश्वासन दिले.

याचबरोबर ग्रामस्थांनी सुध्दा या वेळी ग्रामस्थांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे यांना या आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचा-यांची बदली करावी असे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *