Friday, April 26, 2024
Homeनगरशेतीची थकीत वीज बील वसुली अन्यायकारक

शेतीची थकीत वीज बील वसुली अन्यायकारक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्रात शेतीची थकीत वीज बील वसुली चालू आहे. त्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी रोहित्र बंद करून शेतकर्‍यांना वेठीला धरत आहेत.

- Advertisement -

शेतीची थकबाकी शेतकर्‍यांनी जाणीवपूर्वक थकवलेली नाही. शेतकरी भरत असलेले वीजबिल हे अतिरिक्त असून राज्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळे ही अन्यायकारक वसुली स्थगित करून अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी केली आहे.

पंजाब, हरियाणा व तामिळनाडू या राज्यांत शेतीसाठी वीज मोफत आहे तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांत शेतीसाठी वीज पूर्ण अनुदानित म्हणजे मोफतच आहे. तर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांतील शेतीसाठी आकारण्यात येणार्‍या दरापेक्षा महाराष्ट्रात हा दर साधारण 2-3 पट आहे. आणि हा दर राज्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे.

कारण कृषी मूल्य आयोग शेती मालाचा किमान आधारभुत दर ठरवताना तो किमान खर्चावरच ठरवला जातो. उत्तर भारतातील कालवा सिंचन दर हा महाराष्ट्रातील कालवा सिंचन दराच्या 20-25 टक्के आहे त्यातही महाराष्ट्रात कालवा सिंचन कमी असल्याने विहीर उपसा सिंचन वापरले जाते. त्यामुळे विहीर खोदाई, विहिरीची देखभाल, वीजपंप खरेदी, देखभाल खर्च, महागडी वीज, इतर राज्यांच्या तुलनेने महाग डिझेल यामुळे आपल्या राज्यातील शेती मालाचा उत्पादन खर्चही जास्त आहे.किंबहुना हेच महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे.

सर्व खर्च कमी असल्यामुळे इतर राज्यातील उत्पादन खर्चही कमी असतो त्यामुळे कृषी मूल्य आयोग किमान खर्चावर दर ठरवण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे तसेच कृषी विभागाने पाठवलेल्या खर्चापेक्षा 40-50 टक्के कमी किमान आधारभूत दर ठरवला जातो. शेतकरी भरत असलेले वीजबिल हे अतिरिक्त असून राज्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळे ही अन्यायकारक वसुली स्थगित करून अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या पत्रकावर सुरेश ताके, जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष रामचंद्र ज्ञानदेव पटारे, भरत रामचंद्र आसने, दत्तात्रय जगन्नाथ लिप्टे, राजेंद्र किसनराव भांड, दिलीप कचरु गलांडे, किरण बाबुराव ताके, नामदेव येवले, अतुल खरात, महेश लवांडे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या