Thursday, April 25, 2024
Homeनगरयोग्य मोबदला न दिल्यास सुरत-चेन्नई महामार्गाविरोधात आंदोलन छेडणार

योग्य मोबदला न दिल्यास सुरत-चेन्नई महामार्गाविरोधात आंदोलन छेडणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील सात गावातून सुरत-चैनई महामार्ग जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जमिनी अधिग्रहण करण्याची तयारी सुरू होणार आहे, मात्र शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार आणि शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घेण्यासंदर्भात चिंचोडी पाटीलजवळील सांडवा फाटा येथील समाधान मंगल कार्यालयात शनिवारी (दि.23) मेळावा आयोजित केला असून ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण होणार आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन केले चिचोंडी पाटीलचे माजी उपसरपंच शरद पवार यांनी केले आहे. नगर तालुक्यातील सोनेवाडी, मदडगाव, भातोडी, चिंचोडी पाटील, दशमी गव्हान, आठवड या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनीवर मोठया प्रमाणावर अधिग्रहण होणार आहे.

मात्र जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. विहीर, बोर, फळबागांसह अनेक पिकांचे नुकसान होणार असून त्याचाही योग्य किंमत दिली जात नाही. त्याबाबत गुरूवारी महाविकास आघाडीने थेट शेकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. या शेतकर्‍यांच्या हक्कासाठी दोन महिन्यांपासून चिंचोडी पाटीलचे उपसरपंच शरद पवार यांनी लढा उभा केला आहे. त्याला मोठे स्वरूप आले आहे.

पाहणी करण्यासाठी अनेक राजकीय नेते व शेतकरी उपस्थित राहून तक्रारींचा पाढाच वाचला आहे. तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर असल्याचे शेलार गाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सभापती प्रवीण कोकाटे, केशव बेरड, साहेबराव शेडाळे, संदीप गुंड, अशोक तरटे, प्रकाश पोटे, घनश्याम लबडे यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या