Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ६११ कोरोना संशयित निगेटिव्ह; ५७१ रुग्णांना डिस्चार्ज

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ६११ कोरोना संशयित निगेटिव्ह; ५७१ रुग्णांना डिस्चार्ज

नाशिक | जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतची सायंकाळी 6 वाजेपर्यंतची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 611 कोरोना संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह असून 99 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील 919 दाखल कोरोना संशयीतांच्या 923 नमुन्यांची तपासणी  करण्यात आली असून त्यामधील 611 संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह, तर 99 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, 214 संशयीतांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज अखेर 561 संशयीत रूग्णांना तपासणीअंती आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याने घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील लासलगाव येथील एक व शहरातील एक असे दोन कोरोनाबाधित रूग्ण पूर्णत: बरे झाले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे,  तर जिल्ह्यातील आठ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यु झाला आहे.

- Advertisement -

नाशिक मनपा क्षेत्रातील 349 संशयितांचे 351 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 10 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून 276 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 65 अहवाल प्रलंबित आहेत व 74 संशयितांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील 339 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 85 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 134 अहवाल निगेटिव्ह असून 121 अहवाल अप्राप्त आहेत व 245 संशयितांवर उपचार करण्यात येत आहेत.

मालेगाव येथील 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीण भागातील 203 संशयितांचे 205 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 04 रूग्ण पॉझिटिव्ह असून 176 संशयितांचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत, तर 25 अहवाल प्रलंबित आहे, 1 रूग्ण पुर्णत: बरा झाला आहे. व 36 संशयितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याच्या बाहेरील 28 संशयितांपैकी 25 संशयितांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह असून 3 अहवाल प्रलंबित आहेत.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात 13, नाशिक महानगरपालिकेच्या रूग्णालयात 02, मालेगाव महानगरपालिका रूग्णालय 74, शासकीय रूग्णालय, मालेगाव 10 असे 99 संसर्गित जिल्ह्यात आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या