Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशNDA चे दारं आता मुलींसाठीही खुली

NDA चे दारं आता मुलींसाठीही खुली

दिल्ली | Delhi

सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देणारा निकाल जाहीर केला आहे.

- Advertisement -

NDA म्हणजेच, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारं आता मुलींसाठीही खुली होणार आहेत. एनडीएची प्रवेश परीक्षा (NDA Exam) मुलींनाही देता येणार आहे. या निर्णयानं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) देशभरातील मुलींना मोठा दिलासा दिला आहे.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy) आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये (Indian Naval Academy) महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये ((Supreme Court)) अ‌ॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर मार्च महिन्यात सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobade) यांच्या बेचसमोर सुनावणी झाली होती.

सरन्यायाधीश बोबडे निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती संजय किशन आणि ह्रषिकेश रॉय यांच्या खडंपीठासमोर सुनावणी झाली. कुश कार्ला यांच्या याचिकेवर न्यायालयानं अंतरिम आदेश जारी केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या