Nashik : भुजबळ समर्थकांनी घेतला राष्ट्रवादी भवनाचा ताबा

नाशिक | Nashik

अजित पवारांनी (AJit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP)उभी फुट पडली असून आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांच्या (Shinde-Fadnavis) युती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पाच लाखांची खंडणी द्या, अन्यथा बॉम्बने दुकान उडवू; दुकानदाराला धमकावले

त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीचे परिणाम राज्यातील विविध जिल्हा आणि तालुका पातळीवर उमटतांना दिसत आहेत.अशातच आता नाशिकमध्ये (Nashik) सुद्धा राष्ट्रवादीच्या फुटीचे परिणाम उमटल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी भवनाचा (Ncp Office) छगन भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे आणि युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी काही समर्थकांसह ताबा घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर : ‘गोधड्याचा पाडा’ ही नवी ग्रामपंचायत स्थापन

तसेच राष्ट्रवादी भवनाजवळ छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) मंत्रीपदी वर्णी लागल्याने शुभेच्छांचे फलक देखील लावण्यात आले आहेत. याशिवाय कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर कालच शरद पवार यांच्या गटाने भुजबळांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांना मुळ राष्ट्रवादीतून बडतर्फ केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिककरांना दिलासा! तूर्तास पाणीकपात नाही

कॉंग्रेसने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झळकावले फलक

सध्याच्या महाराष्ट्राच्या उलथापालतीच्या राजकारणावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटण्याचे परिस्थितीवर नाशिक शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरांमध्ये पक्षाच्या प्रसाराचे फलक झळकावले. काँग्रेस भवन महात्मा गांधी रोड, द्वारका सारडा सर्कल, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, जुने नाशिक अशा विविध ठिकाणी काँग्रेसच्या या फलकाने लोकांचे लक्ष वेधले आहे