Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपरनार्ड रिकार्ड कंपनी कडून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

परनार्ड रिकार्ड कंपनी कडून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

ओझे । दिंडोरी

दिंडोरी येथील शासकीय आय टी आय मध्ये सुरू करण्यात आलेले ऑक्सिजन कोविड सेंटरसाठी परनार्ड रिकार्ड कडून आज जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरू करन्यायत आला. गरजेनुसार ऑक्सिजन सिलेंडर कंपनीच्या वतीने पोहच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

दिंडोरीत ऑक्सिजन बेड कोविड सेंटरचे उदघाटन विधानसभा हंगामी अध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

यापूर्वी या कोविड सेंटरसाठी परनार्ड रीकार्ड प्रा.लिमिटेड च्या वतीने उत्कृष्ट प्रतीचे 50 परिपूर्ण फॉवलेर हॉस्पिटल बेड (खाटा, गादी, उशी) देण्यात आले आहे.

यावेळी प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी तालुक्यातील विविध कंपनीना कोविड सेंटर ला मदत करण्याचे आवाहन केले होते.

ऑक्सिजन चा तुटवडा असल्याने ऑक्सिजनची गरज लक्षात घेता. प्रशासनाच्या आवाहनाला परनार्ड रिकार्ड कंपनी ने प्रतिसाद देत तात्काळ एका ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी करार करून दिंडोरी कोविड सेंटर साठी ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहे.या कोविड सेंटर साठी गरजेनुसार ऑक्सिजन सिलेंडर पोहच करण्यात येणार आहे.अशी माहिती कंपनी व्यवस्थापन यांनी दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मागील वर्षांपासून तालुक्यात कोट्यावधीची विकासकामे करण्याबरोबरच कोरोनाला रोखण्यासाठी कंपनी नेहमी पुढाकार घेत आहे. सुरवातीपासूनच शासनाला कोरोना निधी, दिंडोरी तालुक्यात सॅनिटीझर,मास्क, चे वाटप यापूर्वी केलेले आहे.

दिंडोरी कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्यासाठी परनार्ड रिकार्ड कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजयकुमार खुंटीया, फायनान्स प्रमुख अवधेश गोयल, व्यवस्थापक राजेंद्र देशमुख, वायनरी प्रमुख शरद नागरे, राहुल सक्सेना, कैलास सत्ती यांचे योगदान लाभले.

सदर मदतीमूळे रुग्णांना जीवनदान मिळणार असून दिंडोरी तालुक्यातील जनतेच्या वतीने परनार्ड रिकार्ड कंपनीचे आभार मानले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या