Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आज होणार 'सुपरमून'चे दर्शन

खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आज होणार ‘सुपरमून’चे दर्शन

मुंबई | Mumbai

खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. अवकाशात आज सुपरमून म्हणजे सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे.

- Advertisement -

वर्षभर पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राच्या आकारापेक्षा यंदा चंद्राचा आकार चौदा टक्क्यांनी मोठा असेल. हा अभूतपूर्व नजारा नागरिकांना ‘याची देही याची डोळा’ पाहता येणार आहे.

खरोखरीचा अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबरर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी दिसतील.

सुपरमून म्हणजे काय?

पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर असतो.

तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर असतो. तेव्हा पौर्णिमा असते. जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो. सुपरमून हा नेहमीच्या चंद्रापेक्षा सुमारे १४% टक्के मोठा आणि सुमारे ३० टक्के अधिक प्रकाशमान भासतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या