Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारहातधुई आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी अधीक्षक निलंबीत

हातधुई आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी अधीक्षक निलंबीत

मोदलपाडा | वार्ताहर – MODALPADA

धडगाव तालुक्यातील हातधूई (Hathadhui) येथील शासकीय आश्रम शाळेतील (Ashram school) विद्यार्थ्याच्या (student) आत्महत्येप्रकरणी (suicide case)अधिक्षकास (Superintendent) निलंबित (suspended) करण्यात आले असून मुख्याध्यापकासह इतर तीन शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती तळोदा प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

- Advertisement -

धडगाव तालुक्यातील हातधूई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पालकांनी संतप्त भावना व्यक्त करत जबाबदार कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यावेळी प्रकल्प अधिकार्‍यांनी दोषी कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी चौकशी समिती नेमली होती.

या चौकशी समितीने प्रकल्प अधिकार्‍यांना अहवाल सादर केल्यानंतर प्रकल्प अधिकार्‍यांनी आश्रमशाळेतील अधिक्षक यांना निलंबित केले आहे. तर मुख्याध्यापक व इतर तीन शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. शिक्षकांनी मुलांची व्यवस्थित काळजी घेतली नसल्याचा ठपका ठेवला आहे.

मुख्याध्यापकांंनी शाळेतील अधीक्षिका ही गेल्या चार महिन्यांपासून रजेवर असतांना त्याबाबत प्रकल्पास वेळोवेळी कळविले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाने कर्मचार्‍यांवरील केलेल्या कारवाईने आश्रमीय कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अधीक्षिकाही निलंबित

या आश्रमशाळेतील स्त्री अधीक्षिका यांची केवळ दोन दिवसांची किरकोळ रजा होती. ही रजा संपून त्या शाळेत रुजू होणे अपेक्षित होते. मात्र त्या गेल्या चार महिन्यापासून रजेवरच आहेत. याबाबाबत मुख्याध्यापकांनी नोटीसही दिली होती. तरिही त्या आजतागायत बेकायदेशोर रजेवर असल्याने प्रकल्पाने त्यांना देखील निलंबित केल्याचे सांगण्यात आले.

लोभाणी शाळेतील विद्यार्थिनी कोरोना पॉझिटीव्ह

तळोदा तालुक्यातील लोभाणी येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील इयत्ता १० वीला शिकणारी विद्यार्थिनी करोना पॉझिटिव्ह आली आहे. या विद्यार्थिनींमध्ये तापाची लक्षणे होती त्यामुळे तिचा स्वब घेण्यात आला होता.

रिपोर्ट करोना पॉसिटीव्ह आला असून तिच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. शिवाय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना कर्मचार्‍यांना दिली. इतर विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या