Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारपोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची मुंबईला बदली, पी.आर.पाटील नवे एसपी

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची मुंबईला बदली, पी.आर.पाटील नवे एसपी

नंदुरबार । (nandurbar) प्रतिनिधी-

येथील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची मुंबई (Mumbai) शहर उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्याजागी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभाग कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत हे गेल्या दोन वर्षापासून नंदुरबार (nandurbar) येथे कार्यरत होते. आज राज्य शासनाने आयपीएस अधिकार्‍यांचे बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात श्री.पंडीत यांची मुंबई (Mumbai) शहर उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर (Kolhapur) येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.पाटील हे लवकरच त्यांचा पदाचा कार्यभार सांभाळतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या