Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगाव लाॅकडाऊन; पोलीस अधीक्षकही उतरले रस्त्यावर

जळगाव लाॅकडाऊन; पोलीस अधीक्षकही उतरले रस्त्यावर

जळगाव | प्रतिनिधी| Jalgaon

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन आदी मंगळवारी सकाळी सकाळपासून रस्त्यावर उतरले. आकाशवाणी चौकात एकाच मोटारसायकलवर अनावश्यकरित्या फिरणारे दोन जण पोलिसांशी हुज्जत घालत होते. हा प्रकार पोलीस अधीक्षकांच्या लक्षात येताच ते त्यांच्या शासकीय वाहनावरुन उतरले आणि वाद घालणार्‍या त्या मोटारसायकलस्वाराचा समाचार घेत त्याच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश इतर पोलीस कर्मचार्‍यांना दिले.

- Advertisement -

सात दिवसांच्या लॉकडाऊनची सुरुवात होताच पहिल्याच दिवशी शहरातील चौकाचौकात बंदोबस्तासाठी पोलिसांचे ताफे दिसत होते. मोटारसायकलवर डबलसीच आणि चारचाकी वाहनात चालक व त्यासोबत एक जणापेक्षा जास्त प्रवासी दिसल्यास त्या वाहनाचालकांविरुद्ध कारवाईचे सत्र राबवण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त घराबाहेर निघालेल्या व्यक्तींची पोलीस कसून चौकशी घेत होते. पोलिसांना घराबाहेर निघण्याचे समाधानकारक उत्तरे न देणार्‍या अनेक वाहनचालकांचा समाचार पोलिसांनी घेतली.

अनेकांनी घातली हुज्जत

शहरातील अनेक ठिकाणी अनावश्यक कारणासाठी बाहेर निघणार्‍या नागरिकांना पोलिसांनी हटकले असता बहुतेक जणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तर काही धट्टींग करणार्‍या तरुणांना पोलिसानी खाकीचा हिसका दाखवला. नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, टॉवर चौक, नेरी नाका चौक, कोर्ट चौक, गणेश कॉलनी, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली, रेमंड चौफुली, आरएल चौफुली, महाबळ, संभाजीनगर चौक, रामानंद, काव्यारत्नावली चौक, वाघनगर, शिवकॉलनी, दादावाडी, खोटेनगर, ख्वॉंजामिया चौक, रेल्वेस्थानक परिसर, शिवाजीनगर, जुने जळगाव, कालिकांमाता मंदिराजवळील भुसावळ महामार्ग, मेहरुण आदी परिसरात पोलिसांचा चौख बंदोबस्त होता.

शहरातील रस्त्यांवर नेहमी सारखी गर्दी न दिसता बहुसंंख्य ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट होता. भाजापाला विक्रीचे नेहमीचे ठिकाणं रिकामे दिसत होती. अत्यावश्यक सेवेत, दूध विक्री, मेडीकल व दवाखाने आदीच सुरू दिसत होते. दंडात्मक कारवाईमहापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. मोटारसायकलवर डबल सीटसाठी मज्जाव करण्यात आला.

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनचालकांना रस्त्याने ये-जा करण्यास मनाई केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या