सुपा पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत सहा जणांना करोना

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनला करोनाची साखळी दिवसेंदिवस घट्ट होत असून आज अखेर एक अधिकार्‍यांसह पाच पोलीस शिपायांना करोनाची बाधा झाली

असून त्यातील पाच जण उपचारानंतर घरी गेले आहेत तर एका पोलीस हवलदारावर उपचार चालू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 30 महसुली गावासह दोन औद्योगिक वसाहती व 30 किलो मीटरचा महामार्ग या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोडतो. या सर्व क्षेत्रासाठी सुपा पोलीस स्टेशनला दोन अधिकार्‍यांसह 30 कर्मचारी आहेत.

त्यात महिला कर्मचारी सहा-सात आहेत. मार्चपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन चालू झाले. तेव्हा पोलीस स्टेशनमधील पन्नास-पंच्चावन वयाच्या पुढील कर्मचार्‍यांना सुट्टीवर पाठवण्यात आले तर आतापर्यंत एक अधिकार्‍यासह पाच कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली आहे.

तर दोन-चार आजारपणामुळे रजेवर असतात. त्यामुळे नागरिकांचे संरक्षण करणे व कायदा सुव्यवस्था राखताना वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच सुपा परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. महामार्गावर रोजच अपघातासह वादावादी नेहमीच चालू आहे. दोन्ही औद्योगिक वसाहतीत नेहमीच कशावरून तरी टोकाचे संघर्ष आहेच.

गावागावांत छोटी-मोठी भांडण-तंडे वेगळेच. या सगळ्यातूनही हे मार्ग काढत आहे; परंतु आता सुपा परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस शिपायांना यांच्या धोका होऊ लागला आहे.

त्यामुळे आतापर्यंत बर्‍याच पोलीस कर्मचार्‍यांना याचा फटका बसला आहे. कर्तव्य पार पडत असताना आपल्या परिवाराला वेळ देता येत नाही तर काही कर्मचारी सुरक्षितता म्हणून घरच्याना अडचण नको म्हणून घरीच जात नाही.

सुपा पोलीस स्टेनला अपुरे मनुष्यबळ आहे. येथे कर्मचारी वाढवून द्यावेत, ही खूप जुनी मागणी आहे; परंतु याकडे कोणी लक्ष देत नाही, यात हे काम करतात परंतु करोनासारख्या गुन्हेगारानेच आव्हान उभे केल्याने पोलिसापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

सुपा पोलीस स्टेशनला अजून एका दुय्यम अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. आज घडीला करोनाने आजारी, ज्येष्ठांना सक्तीची रजा व थोडे फार वैयक्तिक अडचणीमुळे रजेवर असल्याने मनुष्य बळाची कमतरता भासत आहे.

– डॉ. रांजेंद्र भोसले, पोलीस निरिक्षक, सुपा पोलीस स्टेशन.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *