Wednesday, April 24, 2024
Homeनगरकंपनीत अपघात होऊन कामगार ठार

कंपनीत अपघात होऊन कामगार ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Supa

सुपा औद्योगिक वसाहतीतील (Supa MIDC) एका कंपनीत अपघात (Accident) होऊन यात कामगार ठार (Worker Death) झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी घडली.

- Advertisement -

दुधाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

भरत कचरु काळे (30, रा.अस्तगाव, ता.पारनेर) असे या अपघातात (Accident) मृत्यू (Death) झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10.25 वाजता सुपा औद्योगिक वसाहतीतील (Supa MIDC) बाँक्सव्हीया या कंपनीत भरत हा युवक मशिनवर काम करत आसताना अचानक तो मशिनमध्ये (Machine) अडकला इतर कामगारांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र मशिन बंद करेपर्यंत तो गंभीर जखमी (Injured) झाला. कामगारांनी त्यास सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यावर उपचार होण्यपुर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषीत केले.

मार्चएण्ड आला तरी झेडपीचा 71 टक्केच खर्च

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनच्या पीआय गडकरी (PI Jyoti Gadkari) यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस (Supa Police) घटना स्थळी व रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. सुपा पोलिसांनी फिर्यादीच्या माहिती वरुन आकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास  बी.बी. रेपाळे करत आहेत. मयत भरत काळे याची घरची परिस्थिती हलाकीची असुन त्यास एक लहान भाऊ असुन आई-वडील मोलमजुरी  करतात. घरातील कर्ता मुलगा गेल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीबरोबर इच्छेविरुद्ध अनैसर्गिक कृत्य

- Advertisment -

ताज्या बातम्या