Friday, April 26, 2024
Homeनगरसुपा येथील आरोग्य सेविकेला पंतप्रधानांची शब्बासकी

सुपा येथील आरोग्य सेविकेला पंतप्रधानांची शब्बासकी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका अश्विनी भनगडे – करडीले यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना सन्मानपर पत्र पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

या पत्रात म्हटले आहे की, तुमच्या सहभागाने भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 17 जुलै 2022 रोजी आम्ही 200 कोटी लसींचे लक्ष्य गाठले. कोविड-19 विरुद्धच्या आमच्या लढ्यात ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्याने सिद्ध केले की तुमचा भारत आज तळागाळ्यातील माणसापर्यंत टोकाला पोहोचला आहे.

तुमच्यासारख्या लोकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे आहे. तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आणि या मोहिमेत तुमची भूमिका बजावल्याबद्दल मी तुमचे कौतुक करू इच्छितो. येणार्‍या पिढ्यांना भारताच्या या कर्तृत्वाचा त्या काळात अभिमान वाटेल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा. असेे भावनीक पत्र देऊन पंतप्रधान मोदीनी या आरोग्य कर्मचार्‍यांच्या कार्याचा गुणगौरव केला आहे.

आरोग्य सेविका अश्विनी करडीले यांना पंतप्रधान मोदीनी गौरवल्याबदल आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, सुपा गावचे सरपंच मनिषा रोकडे, उपसरपंच दत्तात्र्य पवार व सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या