Thursday, April 25, 2024
Homeनगरसुपा : 15 जागेसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल

सुपा : 15 जागेसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल

सुपा (वार्ताहर) –

पारनेर तालुक्यातील सर्वात संवेदनशील म्हणून ओळख आसलेल्या व औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झालेल्या मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळख

- Advertisement -

असलेल्या सुपा ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे.

23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत ग्रांमपचायत सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज भरायचे होते. 30 डिसेंबर 2020 पर्यंत सुपा ग्रामपंचायतीच्या एकूण 15 जागेसाठी 73 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍याकडे जमा झाले. गुरवार (दि. 31) आलेल्या अर्जाची छाननी झाली असता. एका व्यक्तीचे एका जागेसाठी एकच अर्ज ठेवावे लागत असल्यमुळे तीन जागी तीन अर्ज काढून घेण्यात आले व इतर सर्वच्यासर्व 70 अर्ज योग्य म्हणून निवडणूक अधिकार्‍यांनी नियमित केले. सोमवार (दि. 4 जानेवारी) पर्यत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. परंतु सध्या तरी खुप रथी-महारथी मैदानात उतरले आहे. यात माजी सरपंचासह माजी सदस्य ही पुन्हा लढतीला सज्ज झाले आहे. तर काही युवा पैलवानही आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. तर काही गाव कारभार्‍यांना आरक्षणाचा फटका बसल्याने कारभारनींना मैदानात उतरावे लागले आहे.

सुपा ग्रामपंचायतीत औद्योगिक वसाहतीमुळे झपाट्याने पुढे जात आहे. यात ग्रामपंचायतीचे दोन प्रभाग सुपा गावचा शेत मळ्यात, वाड्यावस्तावर विभागले गेले आहे. दोन प्रभाग पुर्णपणे जुने सुपा गावठानात आहेत. तर एक प्रभाग नवीन सुपा म्हणून ओळखले जाते. यात जास्त करुन सुपा व्यतिरिक्त बाहेरील नागरिकांचा भरणा आहे. यात मतदानही मोठी आहे. उमेदवारी अर्ज जास्त असले तरी गावची निवडणूक सर्वच राजकीय पक्षानी राजकीय जोडे बाहेर काढून सोयीस्कर जोड्या लावत ‘तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत, गळ्यात हात घातले आहे’. सोमवारी 4 जानेवारीला एकूण लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तेव्हाच कळेल लढत दुंरगी होते की बहुरंगी याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या