Thursday, April 25, 2024
Homeनगरसुपा बसस्थानक चौक बनलाय मृत्यूचा सापळा

सुपा बसस्थानक चौक बनलाय मृत्यूचा सापळा

पारनेर | तालुका प्रतिनिधी

अहमदनगर पुणे महामार्गावरील सुपा बस स्थानक चौक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला असुन सर्व बाजुने अतिक्रमने वाढत आसल्याने रस्ते चौक अंकुचित झाला आहे.

- Advertisement -

अहमदनगराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख होत असलेल्या सुपा गावातील मुख्य प्रवेशद्वार असलेला सुपा बस स्थानक चौक दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. वाढती रहदारी, वाढती वाहन संख्या, वाढलेले अतिक्रमनाचे प्रमाण, चालकाचे बेजबाबदारपणे वाहन चालवणे यामुळे या चौकात नियमित आपघात होत आहेत.

‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

अनेक नागरिकांनी येथे प्राण गमावले असुन शेकडो जायबंदी झाले आहेत. शाळकरी मुले, वृद्ध, अपंग जीव मुठीत घेऊन रस्ता पार करतांना कसरत करावी लागत आहे. तर वाहन चालक जो तो आपआपल्या परीने वाहन चालवत रस्ता क्राँस करतो त्यामुळे धडकने घासाघीस यामुळे चौकात भांडण रोजचेच झाले आहे.

चौकाचे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व पाहता या ठिकाणी अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. चौकाच्या आजूबाजूस हॉटेल, पानटपऱ्या या व अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले आहेत. या ठिकाणी नाश्‍ता वा जेवणासाठी वाहने थांबतात. मात्र, यामुळे वाहनचालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

IPL 2022 Mega Auction : ‘या’ दिग्गज खेळाडूंची मेगा ऑक्शनमधून माघार, फॅन्सची होणार निराशा

एखाद्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकास समोरून येणारे वाहन सोडल्यास इतर दोन दिशांनी येणारे वाहन अगदी जवळ आल्याशिवाय दृष्टिपथात येत नाही. या ठिकाणी रस्ता दुभाजक नाही तसेच वेग नियंत्रक नाहीत. त्याशिवाय वेगावर नियंत्रण ठेवण्यासंबंधीच्या सूचनांचे फलक वा दिशादर्शकसुध्दा नाहीत.

या सर्व परिस्थितीमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडून त्यांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मागील काही दिवसांत अपघात होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यात काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा चौक प्रवाशांसाठी अपघातग्रस्त ठिकाण बनला आहे.

Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?

सुपा बस स्थानक चौकात उड्डाण पुल, भुयारी मार्ग किंवा सर्कल व्हावे अशी नागरिकांची खुप जुनी मागणी आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही.

रोहन दळवी, व्यावसायिक

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

- Advertisment -

ताज्या बातम्या