Friday, April 26, 2024
Homeजळगावबीएचआर घोटाळा, सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

बीएचआर घोटाळा, सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव । Jalgaon

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरचा ( Sunil Zanwar) जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसापूर्वी सुनील झंवरच्या ( Sunil Zanwar) जामीन अर्जावर बचाव पक्षाने आपली बाजू मांडल्यानंतर सरकार पक्षाने झंवर याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. पुणे न्यायालयात (Pune court) सुनील झंवरने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. झंवरच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर सरकारपक्षाने आपले म्हणणे सादर केले होते. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी सुनील झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता

तसेच पोलिस तपासात सुनील झंवर ( Sunil Zanwar) याने अनुप कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते. या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले होते की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका,असे म्हटले होते. हा मुद्दा देखील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. बीएचआर घोटाळ्याचा झंवर हाच मुख्य सूत्रधार आहे. तसेच तो फरारी असतानाही साक्षीदारांना संपर्क करून दबाव टाकलेला आहे.

घुले रोड येथील जागेवर जोराने बँकेकडून कर्ज घेतले आहे, असे अनेक प्रभावी मुद्दे प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात मांडले होते. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एस.एस. गोसावी यांनी झंवरचा जामीन आज अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळल्याच्या वृत्ताला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या