Saturday, April 27, 2024
Homeक्रीडासुनील गावसकरांची ‘ती’ टोपी लिलावात

सुनील गावसकरांची ‘ती’ टोपी लिलावात

नवी दिल्ली – New Delhi

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी 1971च्या इंग्लंड दौर्?यावर परिधान केलेली टोपी आणि टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोचिंग किट ऑनलाइन लिलावात खरेदी केली जाऊ शकते.

- Advertisement -

क्रिस्टीच्या लिलावात सर जेफ्री बॉयकॉट यांचे संग्रह आणि टी-20 चॅरिटी क्रिकेटशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे. 27 ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू झाला आहे.

यामध्ये एक बॅट असून या बॅटने प्रथम श्रेणीच्या सामन्यात त्यांनी 100 वे शतक पूर्ण केले होते. हेडिंग्ले येथे 11 ऑगस्ट 1977 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस कसोटी सामन्यात त्यांनी घरच्या मैदानात हा पराक्रम केला. या बॅटला 30 ते 50 हजार पौंड (सुमारे 28.95-48.25 लाख रुपये) मिळण्याची शक्यता आहे.

मायकेल होल्डिंग यांचा शर्टदेखील लिलावात

या लिलावात मायकेल होल्डिंग यांचा शर्टदेखील आहे. त्यांनी 14 मार्च 1981 रोजी ब्रिजटाऊनमध्ये बॉयकॉट यांना शून्यावर बाद केले. त्यावर होल्डिंग यांची स्वाक्षरी आहे. 1971 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर गावसकर यांनी घातलेली कॅपही या संग्रहात समाविष्ट आहे. हा लिलाव 16 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या