Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपशुधन विकासासाठी विशेष प्रयत्न - सुनील गडाख

पशुधन विकासासाठी विशेष प्रयत्न – सुनील गडाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या विशेष घटक योजनेंतर्गत लाभार्थींना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी तब्बल 4 कोटी 90 लाख 50 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून दुधाळ जनावरे, वैरण विकास, कुक्कुट पिल्ले, पशुखाद्य अशा योजनांसाठी लाभार्थींना थेट बँक खात्यात अनुदान मिळणार आहे. या निवडीत बीपीएल, अल्पभूधारक, अपंग, महिला, आदिवासी यांनाही शासकीय निकषाप्रमाणे योजनेचा लाभ मिळणार आहे. निधीचा योग्य विनियोग करून पात्र लाभार्थीपर्यंत योजना पोहचविण्याचा प्रयत्न होत असून जिल्ह्यातील पशुधनासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एकूण 4 कोटी 90 लाखांचा निधी वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील लाभार्थींची निवड सोडत पध्दतीने सभापती गडाख यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या सोडतीवेळी सभापती रावसाहेब कांगुणे, राजेश परजणे, बाळासाहेब हराळ, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, डॉ. बाळकृष्ण शेळके, धनंजय खेडकर, दयानंद जगताप, डॉ. वृषाली भिसे, दिग्विजय जामदार प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

वैयक्तिक लाभाच्या विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना, सर्वसाधारण योजनांसाठी लाभार्थी निवड करण्यात आली. यात गाय गट वाटप, शेळी गट वाटप, पशुखाद्य वाटप, वैरण विकास योजना, एक दिवसीय कुक्कुट पिल्ले योजनांचा समावेश आहे.या लाभार्थी निवड प्रक्रियेवेळी सर्व पंचायत समितींचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या