Sulli Deals app च्या मास्टरमाइंडला अटक, धक्कादायक माहिती आली समोर

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

‘बुलीबाई’ ॲपच्या (Bulli Bai App) माध्यमातून मुस्लीम समाजातील महिलांची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. याच प्रकारच्या ‘सुल्ली डील्स’ ॲपद्वारेही (Sulli Deals App) सोशल मीडिया वापरणाऱ्या मुस्लीम महिलांचे त्यांच्या अकाउंटवरून छायाचित्र घेऊन ॲपद्वारे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुल्ली डील्स अ‍ॅपची निर्मिती करणाऱ्या मास्टरमाइंडला अटक केली आहे. ओंकारेश्वर ठाकूर (Aumkareshwar Thakur) असे अ‍ॅप तयार करणाऱ्या आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी इंदुर येथून अटक केली आहे. २५ वर्षीय आरोपी ओंकारेश्वर ठाकुर याने इंदुरच्या (Indore) आयपीएस अ‍ॅकॉडमीतून BCA केले आहे.

गेल्या वर्षी जुलै २०२१ मध्ये त्याने सुल्ली डील्स अ‍ॅपची निर्मिती केली होती. ओंकारेश्वर हा ट्विटरवर असलेलय ट्रेड ग्रुपचा सदस्य होता. या ठिकाणी मुस्लीम महिलांची बदनामी करण्याचा कट याच ग्रुपवर झाला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान बुल्लीबाई आणि सुल्लीडील्स या ॲपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांची बदनामी करण्याच्या आरोपाखाली श्वेता सिंह, विशाल झा, मयांक रावत यांना अटक केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *