Friday, April 26, 2024
Homeनगरसुजित झावरे यांच्या जामिनावर 7 ऑक्टोबरला सुनावणी

सुजित झावरे यांच्या जामिनावर 7 ऑक्टोबरला सुनावणी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

खंडणी, विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष

- Advertisement -

सुजित झावरे यांचा जामीन कायम करण्यासाठी 7 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे.

सुजित झावरे यांना जिल्हा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केलेला होता. हा जामीन कायम करण्यासाठी मंगळवारी दि. 29 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु ही सुनावणी आता 7 ऑक्टोबरला होणार आहे. या जामीन प्रकरणी न्यायालयात पोलिसांच्यावतीने म्हणणे सादर केले असल्याची माहिती तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली.

कांदा निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर तहसीलदार देवरे व सुजित झावरे यांच्यात हमरीतुमरी झाली होती. तहसीलदार देवरे यांनी सुजित झावरे यांच्यावर खंडणी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा प्रकरणी फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल झालेले आहेत. यावर सत्र न्यायालयाने झावरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

या जामिनाची मुदत संपल्याने न्यायालयात मंगळवारी (दि. 29) सुनावणी झाली. यानंतर झावरे यांच्या अटकपूर्व जामिनाला मुदतवाढ मिळावी म्हणून त्याबाबत 7 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दुसरीकडे तहसीलदार ज्योती देवरे यांना महसूल विभागाच्या कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. झावरे यांना जामीन मिळतो की नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या