Friday, April 26, 2024
Homeनगरनगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुजित जगताप

नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुजित जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी) –

विळद येथील सुजित जगताप यांची नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली

- Advertisement -

आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र देत त्यांची निवड जाहीर केली आहे.

सुजित जगताप न्यू आर्टस् महाविद्यालयाचे पदवीचे विद्यार्थी असून ते विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत आहेत. आजवर त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांच्यामध्ये त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या