Saturday, April 27, 2024
Homeनगरलग्न करण्यासाठी त्रास दिल्याने गळफास; शिर्डीत बहिण-भावावर गुन्हा

लग्न करण्यासाठी त्रास दिल्याने गळफास; शिर्डीत बहिण-भावावर गुन्हा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

लग्न करण्यासाठी मानसिक त्रास देऊन माझ्या मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद या तरूणाच्या वडिलांनी शिर्डी पोलीसात दिल्याने संबंधित तरूणी आणि तिच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथुन जवळच असलेल्या निमगाव येथील तरुणाने पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती.

- Advertisement -

गेल्या 14 ऑगस्ट रोजी अनिकेत रमेश कातोरे या 22 वर्षीय तरुणाने सावळेविहीर येथील के़ के़. मिल्क समोरील पाण्याच्या खाडीत उडी मारून आत्महत्या केली होती़ यासंदर्भात त्याचे वडील रमेश कातोरे यांनी शिर्डी

पोलीसांत मंगळवारी, 29 ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल केली आहे़. त्ययात त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या मुलाने सांगितले होते की, त्याचे एका मुलीशी प्रेमसंबध आहेत़ तिचा भाऊ लग्नासाठी दमबाजी करत आहे़. माझा मुलगा लग्नाला तयार होता. पण स्वत:च्या पायावर उभा राहून दोन वर्षात लग्न करू असे तो म्हणत होता़. याबाबत मी मुलीच्या घरच्यांशीही चर्चा केली होती़ दरम्यान 14 ऑगस्ट रोजी माझ्या मुलाने के़ के़ मिल्क समोरील खाडीत उडी टाकून आत्महत्या केली़ यावेळी त्याच्या बरोबर असलेल्या मित्रांनी सांगितले की, त्याला त्याच्या मैत्रिणीचे फोन येत होते.

त्याने फोन येण्याच्या त्रासावरून खाणीत उडी घेतली़ मुलाच्या मृत्युनंतर त्याच्या बहीणीने त्याचा फोन तपासला असता त्यात एका मुलीचा नंबर अनेकदा आढळला, शेवटचा कॉलही तिचाच होता़ यावरून त्या मुलीने व तिच्या भावानेच मुलाला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद रमेश कातोरे यांनी दिली आहे़ यावरून सबंधित तरूणी व तिच्या भावावर शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे़.

- Advertisment -

ताज्या बातम्या