Saturday, May 11, 2024
Homeनगरऊसतोडणी संघटना व साखर संघाची बैठक तोडग्या विनाच संपन्न

ऊसतोडणी संघटना व साखर संघाची बैठक तोडग्या विनाच संपन्न

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करणेसाठी पुणे येथे साखर आयुक्तलयात

- Advertisement -

गुरुवार दि. 24 सप्टेंबर रोजी ऊसतोडणी कामगार संघटना व साखर संघाचे प्रतिनिधींची बैठक कुठल्याही निर्णया विना संपन्न झाली.

पुणे येथील साखर आयुक्तलयातील साखर संघाच्या कार्यालयात गुरूवार दि.24 रोजी बैठक आयोजित केली होती. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अशोक सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख भानुदान मुरकुटे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन

पाटील,चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे कल्याण काळे, साखर संघाचे प्रशासकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे आदि उपस्थित होते.

तातडीने निर्णय घ्यावा….

ऊसतोड मजुरांच्या असलेल्या मागण्या संदर्भात माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी मध्यस्ती करून अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या