Friday, April 26, 2024
Homeनगरऊस उत्पादकांची बिले अदा न केल्यास आंदोलन

ऊस उत्पादकांची बिले अदा न केल्यास आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याची अर्थव्यवस्था चालवणारा शेतकरी आज अडचणीत आहे. जिल्ह्यातील सहकारी कारखाने व खाजगी कारखाने यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे अनेक महिन्यांपासूनचे पैसे थकविले आहेत. त्यामुळे करोनाच्या संकट काळात ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांची बिले अदा करावीत, अन्यथा 15 दिवसांनी जनआंदोलन जिल्हाभरात पुकारले जाईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाच्यावतीने देण्यात आला.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भार्गव कमिटीच्या शिफारशीनुसार उपपदार्थ निर्मितीमध्ये मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देण्याची तरतूद असताना देखील जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष होत आहे. कारखान्याच्या वजन काट्याविषयी अनेक तक्रारी आहेत. सदोष वजन काट्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक लूट होत आहे. ही लूट थांबली पाहिजे.

ऊसतोड संदर्भात मनमानी पद्धतीने धोरण अवलंबले आहेत. त्यामुळे ऊसतोड उशिरा असल्यामुळे रब्बी पिके घेता येत नाहीत. यासाठी धोरण ठरवणे गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सतीश कानवडे, राजेंद्र बनसोडे, महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, अमित गटने, अंबादास ढाकणे, संदीप उगले, सुनील देवकर, जनार्दन रोहोम तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या