नगर जिल्ह्यातील ऊस गाळपात अंबालिका-ज्ञानेश्वर आघाडीवर

jalgaon-digital
4 Min Read

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 197 साखर कारखान्यांनी 15 फेब्रुवारी 2022 अखेर 829.18 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 843.67 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.19 टक्के आहे.

तर नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांनी 1 कोटी 4 लाख 71 हजार 128 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.जिल्ह्यात ऊस गाळपात अंबालिका व ज्ञानेश्वर साखर कारखाना आघाडीवर आहे.

दि.15 फेब्रुवारी 2022 अखेर राज्यातील 98 सहकारी व 99 खाजगी अशा एकूण 197 साखर कारखान्यांचे विभाग निहाय झालेले ऊस गाळप, साखर उत्पादन,साखर उतारा खालील प्रमाणे –

विभाग ऊस गाळप लाख मे. टन साखर उत्पादन लाख क्विंटल साखर उतारा टक्के

कोल्हापूर विभाग 199.20 231.60 11.63

पुणे विभाग 170.54 176.71 10.36

सोलापूर विभाग 199.88 183.31 9.17

अ.नगर विभाग 114.05 110.14 9.66

औरंगाबाद विभाग : 70.08– 67.21– 9.59

नांदेड विभाग : 82.02– 84.01– 10.24

अमरावती विभाग : 6.13–5.61– 9.15

नागपूर विभाग : 3.33– 2.94– 8.83

—————————————

एकूण – 845.23– 861.53– 10.19

—————————————

नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 15 फेब्रुवारी 2022 2021 अखेर 1 कोटी 4 लाख 71 हजार 128 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी

1 लाख 11 हजार 130 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 09.66 टक्के आहे.नगर जिल्ह्यातील एकूण 1 कोटी 4 लाख 71 हजार 128 मेट्रिक टन

ऊसा पैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 70 लाख 93 हजार 988 मेट्रिक टन तर 8 खाजगी साखर कारखान्यांनी 33 लाख 77 हजार 140 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यानी 15 फेब्रुवारी 2022 अखेर केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे –

अ.नं.–कारखाना–ऊस गाळप मे. टन–साखर उत्पादन क्विंटल– सरासरी उतारा टक्के

1) अंबालिका : 1226195– 1252550 — 10.21

2) ज्ञानेश्वर:- 890620– 850600– 9.55

3) संगमनेर:- 840590 — 859530 — 10.23

4) मुळा : 808520 — 684000 — 8.46

5) गंगामाई : 762950 — 692750 — 9.08

6) श्रीगोंदा : 600120 — 617850 — 10.30

7) कुकडी : 545300 — 539300 — 9.89

8) प्रवरा : 533250 — 414575 — 7.77

9) संजीवनी : 511693 — 449250 — 8.78

10) कोपरगाव : 442087 — 451000 — 10.20

11) अशोक : 441470 — 488050 — 11.06

12) प्रसाद शुगर : 410160 — 416400 — 10.15

13) गणेश : 220800 — 165050 — 7.48

14) राहुरी:- 293080 — 316000 — 10.78

15) वृद्धेश्वर:- 304790 — 300750 — 9.87

16) अगस्ती:- 357738 — 388320 — 10.85

17) केदारेश्वर:- 303930 — 272650 — 8.97

18) साईकृपा, देवदैठण:- 189330 — 194200 — 10.26

19) जय श्रीराम : 216715 — 202230 — 9.33

20) युटेक : 304715 — 293450 — 9.63

21) क्रांती शुगर : 103795 — 107200 — 10.33

22) पियुष :163280 — 155425 — 9.52

——————————————————————————

एकूण : 10471128 –10111130 — 9.66

——————————————————————————

यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत.

नगर जिल्ह्यातील 23 पैकी 22 साखर कारखान्याचे हंगाम सुरू आहेत.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 8 लाख 90 हजार 620 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये तर अंबालिका या खाजगी साखर कारखान्याने 12 लाख 26 हजार 195 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे.

राज्यात खाजगी कारखान्यांची संख्या वाढली

राज्यात 197 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असून त्यामध्ये 98 सहकारी व 99 खाजगी साखर कारखान्याचा समावेश आहे. सहकारी पेक्षा निम्म्याहून अधिक संख्या खाजगी (99) साखर कारखान्यांची आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *