Thursday, April 25, 2024
Homeनगरऊस बिलातून वीज बिल वसुलीला विरोध

ऊस बिलातून वीज बिल वसुलीला विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांचा ऊस बिलातून साखर कारखान्यांनी वीज बिल कपात करण्याच्या आदेशाची महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शहरातील लालटाकी येथील साखर सहसंचालक यांच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली. तर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

साखर संचालक कार्यालयाने शेतकर्‍यांचा ऊस बिलातून वीज बिल कपात करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. हे आदेश अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. तर या आदेशाला विरोध दर्शवत सदर आदेश मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले. ऊस उत्पादकांच्या संमतीशिवाय कोणतीही कपात करणे बेकायदेशीर आहे. हे वीज बिल शासनाने माफ करण्याची आवश्यकता असताना वसुलीची सक्ती केली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ज्या कारखान्याने मागील वर्षी एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना अद्याप पैसे दिले नाहीत त्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावेत, प्रामाणिक कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये मदत ताबडतोब द्यावी, अशा मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ.बन्सी सातपुते, अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.भैरवनाथ वाकळे, बापूराव राशीनकर, संजय नांगरे, अशोक नजन, अप्पासाहेब वाबळे, गहिनीनाथ आव्हाड आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या