Saturday, April 27, 2024
Homeनगरएफआरपी कर्जासाठी ‘सहकार’ने घेतला हा निर्णय

एफआरपी कर्जासाठी ‘सहकार’ने घेतला हा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी) –

सन 2014-15 मध्ये गाळप हंगामात घेतलेल्या साखर कारखान्यांना ऊस पुरविणार्‍या शेतकर्‍यांच्या एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी

- Advertisement -

दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने घेतला आहे. यात नगर जिल्हयातील श्रीरामपुरातील अशोक, कोपरगावातील कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखाना, अकोलेतील अगस्ति, नेवाशातील मुळा, ज्ञानेश्‍वर, संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, श्रीगोंदयातील कुकडी, सहकार महर्षि शिवाजीराव नागवडे आणि पाथर्डीतील वृध्देश्‍वर कारखान्याचा समावेश आहे.

सन 2014 मध्ये गाळप घेतलेल्या कारखान्यांना ऊस पुरविणार्‍या शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी मदत व्हावी यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याबाबत शासन निर्णय 30 जुलै 2015, 5 सप्टेंबर 2015, 9 डिसेंबर 2015ः अन्वये पात्र झालेल्या 54 सहकारी कारखान्यांना उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता, सन 2017-18मधील प्रपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील 54 सहकारी साखर कारखान्यांना उर्वरित तेवीस कोटी त्रेचाळीस लाख तेरा हजार एकशे नव्वद इतकी देय रक्कम सन 2020-21 मध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात नगर जिल्हयातील अनेक साखर कारखान्यांचा समावेश आहे.

अशोक कारखान्याची पात्र व्याज अनुदाची रक्कम 1 कोटी 24 लाख 84 हजार आहे. उर्वरित प्रस्तावित रक्कम 49 लाख 31 लाख 253 रूपये, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना 40 लाख 23 हजार 20 रूपये, वृध्देश्‍वर-13 लाख 60 हजार 438 रूपये, नागवडे 35 लाख 94 हजार 101, कुकडी 37 लाख 15 हजार 140, ज्ञानेश्‍वर 53 लाख ः55 हजार 800, मुळा 59, 22 145, सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात कारखाना 71 लाख 86 हजार 516, नागवडे कारखाना 35लाख 94 हजार 101.

- Advertisment -

ताज्या बातम्या