Friday, April 26, 2024
Homeनगरशासकीय कपाती कमी करुन साखरेचा किमान विक्रीदर 3600 रुपये करा

शासकीय कपाती कमी करुन साखरेचा किमान विक्रीदर 3600 रुपये करा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रतिटन उसाला 5 रुपयांवरून 2 रुपये करण्यात यावा, साखर संकुल देखभाल निधी 50 पैसे वरून प्रति टन 25 पैसे तर स्व.गोपीनाथ मुंढे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळ निधी 10 वरून प्रतिटन 2 रुपये करण्यात यावा त्याच बरोबर गाळप हंगाम 2022-23 पासून उत्पादन खर्चावर आधारीत निश्चित करुन साखरेचा किमान विक्री दर 3600 रुपये प्रति क्विंटल करणेबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली हंगाम 2021-22 चा आढावा व गळीत हंगाम 2022-23 चे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने काही मुद्दे साखर आयुक्तांना सुचवले आहेत.

मागील दोन वर्षांमध्ये कोविड महामारीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता व साखर संकुल निधीमध्ये वाढ करण्यात आली होती. परंतु आता परिस्थिती पुर्ववत झाल्यामुळे व ऊस गाळप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासकीय कपाती कमी करण्यात याव्यात. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रति टन 5 ऐवजी 2 रुपये, साखर संकुल देखभाल निधी 50 ऐवजी 25 पैसे प्रति टन करण्यात यावा, स्व. गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळासाठी प्रति टन 10 रुपयांऐवजी 2 रुपये प्रति टन कपात करावी, असे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या