Thursday, April 25, 2024
Homeनगरऊसतोड बंद आंदोलनात सहभागी व्हा; फुंदे यांचे आवाहन

ऊसतोड बंद आंदोलनात सहभागी व्हा; फुंदे यांचे आवाहन

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी येत्या 17 व 18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड व ऊस वाहतूक बंद ठेवण्याच्या आंदोलनात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केले आहे.

- Advertisement -

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण आध्यादेशामध्ये केलेली दुरुस्ती त्वरित मागे घ्यावी. एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा, तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उतार्‍याच्या आधारावर यंदाच्या सन 2022-23 चा हंगामामध्ये एक रकमी एफआरपी द्यावी, मागील 21-22 च्या हंगामात गाळपास गेलेल्या उसासाठी एफआरपी अधिक 200 रुपये अंतिम भाव मिळावा व राज्य सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत, ऊस तोड मजूर हे स्व.गोपीनाथ मुंढे महामंडळाच्या मार्फतच पुरवावेत आदी मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारले असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या