Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशजागतिक व्यापाराचा शॉर्टकट अखेर मोकळा!

जागतिक व्यापाराचा शॉर्टकट अखेर मोकळा!

दिल्ली | Delhi

जागतिक व्यापाराचा शॉर्टकट समजला जाणारा सुएझ कालवा अखेर मोकळा झाला आहे. सुएझ कालव्यात अडकून पडलेलं महाकाय मालवाहू जहाज बाहेर काढण्यात अखेर पाच दिवसांनंतर यश आलं आहे.

- Advertisement -

भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्र यांना जोडणाऱ्या इजिप्तमधील सुएझ कालव्यात चीनहून नेदरलँडसच्या दिशेने जाणारं एक विशाल मालवाहतूक जहाज अडकल्यानं जगाच्या या महत्त्वपूर्ण व्यापारी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

एव्हर गिव्हन नावाचं पनामाचं तब्बल दोन लाख टन वजनाचं, ४०० मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद असं हे मालवाहतूक जहाज असून, ते चीनहून नेदरलँड्समधील रॉटरडॅम बंदरावर जात होते. तैवानच्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे त्याचं नियंत्रण होतं. हिंदी महासागरातून युरोपमध्ये जाण्यासाठी त्यानं सुएझ कालव्याचा मार्ग घेतला. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ते सुएझ कालव्यात शिरले; पण वेगवान वाऱ्यामुळे त्याची दिशा बदलली आणि नियंत्रण गेल्यानं ते आडवं झालं. त्याची दोन्ही टोकं कालव्याच्या दोन्ही बाजूंना तटली. त्यामुळं इतर जहाजांचा मार्गच बंद झाला.

दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गाळही साचलेला होता. यामुळे अडकून पडलेल्या मालवाहू जहाजाला गाळातून बाहेर काढण्यासाठी पाच दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अडथळे दूर होऊन सुएझ कालवा मालवाहतुकीसाठी पूर्ववत सुरू होईल. त्यासाठी केंद्र सरकारही याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली होती. दरम्यान, आता रविवारी सायंकाळी पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हे जहाज मार्गस्थ करण्यात आलं.

स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ते सुएझ कालव्यात शिरले; पण वेगवान वाऱ्यामुळे त्याची दिशा बदलली आणि नियंत्रण गेल्यानं ते आडवं झालं. त्याची दोन्ही टोकं कालव्याच्या दोन्ही बाजूंना तटली. त्यामुळं इतर जहाजांचा मार्गच बंद झाला. अखेर या जहाजाला बाहेर काढण्यात यश आले आहे.

या १९३ किलोमिटर लांबीच्या कालव्यातून जागतिक व्यापाराच्या जवळपास १० टक्के व्यापाराची दळणवळण होते. यामुळे विशेषतः तेलाचे टँकर्स आणि कंटेनर्सचा दक्षिण आफ्रिकेचा मोठा वळसा वाचतो.

नामांकित शिपिंग जर्नल एललॉड्स यांच्या मते जवळपास ७५ हजार कोटी किमतींच्या वस्तूंचा व्यापार प्रतिदिवशी या कालव्यातून होत असतो. यातील निम्यापेक्षा जास्त वाहतूक ही पश्चिमेकडून तर उरलेली पूर्वेकडून होत असते. यातील एक चतुर्थांश वाहतूक ही कंटनेर शिपची असते. कालव्यातील ही कंटेनरची वाहतून भाडेतत्वावर केली जाते.

सुएझ कालवा प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, २०२० वर्षात तब्बल १९ हजार जहाजांनी या कालव्यातून प्रवास केला. दिवसाला सरासरी ५१ जहाजं या मार्गानं जातात. हा कालवा १५०वर्षे जुना आहे.

सुरुवातीला हा कळवा ब्रिटीश आणि फ्रेंचांच्या ताब्यात होता. १९५६ मध्ये इजिप्तचे नेते गमाल अब्देल नासेर यांनी त्याचं राष्ट्रीयीकरण केलं. काळानुसार हा कालवा मोठा आणि खोल करण्यात आला.

इजिप्तचा हा सर्वांत मोठा आर्थिक स्रोत असून, गेल्या वर्षी सुएझ कालव्यातील वाहतुकीतून इजिप्तला ५.६१ अब्ज डॉलर्स महसूल मिळाला होता. 2०१५ मध्ये यातून वाहतूक करणाऱ्या जहाजांचा वाट बघण्याचा वेळ कमी व्हावा आणि सध्या यातून प्रवास करणाऱ्या जहाजांची संख्या दुपटीनं वाढावी या उद्देशानं २०२३ पर्यंत हा कालवा अधिक रुंद करण्याची योजना इजिप्तनं जाहीर केली आहे.

सुएझ कालव्यात अडकलेल्या या महाकाय मालवाहू जहाजामुळे होणाऱ्या अफाट आर्थिक नुकसानीमुळे इजिप्त अक्षरशः हादरला होता. या वाहतूक कोंडीमुळे दर तासाला इजिप्तचे तब्बल २८०० कोटी रुपयांचे नुकसान होत होत.

दरम्यान, भारतालाही या जहाज कोंडीचा मोठा फटका बसला असून महाराष्ट्रातून युरोपला पाठवला गेलेला जवळपास ४०० डॉलर कोटींचा कृषीमाल सुवेझ कॅनलच्या अलीकडे १३०० कंटेनर्समधे अडकून पडला होता. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गाचं मोठं नुसकान झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या