Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारगोठ्यातील तीन बैलांचा अचानक मृत्यू ; पशु मालकांमध्ये भीतीचे वातावरण

गोठ्यातील तीन बैलांचा अचानक मृत्यू ; पशु मालकांमध्ये भीतीचे वातावरण

अक्कलकुवा l प्रतिनिधी Akkalkuva

अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील वाण्याविहीर येथे एकाच शेतकऱ्याच्या (farmer) गोठ्यातील तीन बैल अचानकपणे दगावल्याने पशु मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

- Advertisement -

.

सध्या देशभरात लंम्पी (Lumpy) जनावराच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून याच काळात वाण्याविहीर येथील जर्मनसिंग गुलाबसिंग पाडवी यांच्या मालकीचे तीन बैल दोन दिवसांपूर्वी गोठ्यातच एकामागे एक ताबडतोब दगावल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

बैल कशामुळे दगावले याबाबत संभ्रम असल्याने तिन्ही बैलांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले व ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) पाटील यांनी सांगितले.

यानंतर या तिन्ही बैलांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. अक्कलकुवा तालुक्यात देखील लंम्पी या जनावरांच्या संसर्गजन्य आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच अशाप्रकारे अचानकपणे जनावरे दगावल्याने पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तरी पशुवैद्यकीय स्तरावर परिसरातील व तालुक्यातील जनावरांची योग्य ती काळजी घेऊन लंम्पीचे देखील लसीकरण होणे गरजेचे आहे. व तशा प्रकारची खबरदारी पशु मालकांनी घेणे आवश्यक आहे.व लवकरात लवकर संबंधित विभागाकडून जनावरांचे लसीकरण करून घेण्यात यावे.जेणेकरून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या