Thursday, April 25, 2024
Homeनगरराहात्यात खळबळ! विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

राहात्यात खळबळ! विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

राहाता | प्रतिनिधी | Rahata

राहाता एरीकेशन बंगल्या समोरील शेतात २६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मृतदेह शेजारी विषारी औषधांची बाटली सापडल्याने मयत युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

शनिअमावस्या : मंदिरच बंद

राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव अमोल पावटे असून तो राहाता शहरातील रहिवासी आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या