Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार

आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )यांनी आपल्यावर सोपविलेल्या आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ( Union Minister of State for Health. Dr.Bharti Pawar ) यांनी लासलगाव ( Lasalgaon )येथे केले.केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच लासलगाव शहरात आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा (ग्रामीण)भाजपाचे अध्यक्ष केदा नाना आहेर होते.

- Advertisement -

कार्यक्रमाचे आयोजक जि प सदस्य डी के जगताप,भाजप महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा तथा लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,लासलगाव भाजप मंडल,शहर भाजप तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत ना भारती पवार यांचे जोरदार स्वागत केले.सर्वप्रथम ना भारती पवार यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले त्यानंतर मेन रोड मार्गे त्यांची जनाशीर्वाद यात्रा लासलगाव चे आराध्य दैवत प पू भगरी बाबा मंदिरात दाखल झाल्यानंतर ना भारती पवार यांनी प. पू. भगरी बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले.या वेळी ना भारती पवार यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना ना. डॉ.भारती पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात सर्वच घटकांनी एकजुटीने केले असून देशातील ५५ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे.मोदी सरकार शेतकरी विरोधी नसून शेतकरी हिताचे आहे.केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविल्या असून त्यामध्ये कृषी कायदा,किसान रेल,शेतकरी सन्मान योजना तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष क्लस्टर साठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी ना भारती पवार यांनी सांगितले तसेच नाशिक जिल्ह्यात आरोग्य योजना बळकट करण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगितले

कार्यक्रमाचे अध्यक्ष केदा नाना आहेर,चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे,जि प सदस्य डी के जगताप,माजी पंचायत समिती सदस्य कैलास सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून मंत्री .डॉ.भारती पवार नाशिक जिल्ह्याचा कायापालट करतील असा विश्वास व्यक्त केला.

बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी प्रास्ताविकात सद्या बाजारपेठेत टोमॅटो ची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भावात घसरण होत आहे.शेजारील राष्ट्रांच्या सीमा बंद असल्याने टोमॅटो ची निर्यात बंद आहे ती सुरू झाल्यास टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळेल या करिता शेजारील राष्ट्रांच्या सीमा खुल्या करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच निमगाव वाकडा व खडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली

या प्रसंगी भा ज प चे सुनील बच्छाव, राविजी अनासपुरे, भागवत बाबा बोरस्ते,शंकरराव वाघ,संजय शेवाळे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,संपत नागरे,संतोष पलोड,राजू राणा,राजेंद्र चाफेकर,शहराध्यक्ष योगेश पाटील,रवींद्र होळकर,संतोष पवार,चिराग जोशी,संजय वाबळे,संजय गाजरे,परेश शहा,प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे,तहसीलदार शरद घोरपडे,निवृत्ती महाराज रायते,प्रदीप माठा,मनीष चोपडा,अरुण भांबारे,दत्तूलाल शर्मा,नितीन शर्मा,स्मिता कुलकर्णी,ज्योती शिंदे,महेश गिरी,उत्तम शिंदे,धनंजय डुंबरे,तुकाराम गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, निलेश सालकाडे,रंजना शिंदे,रूपा केदारे, भारती महाले, नंदा शर्मा, शैलजा भावसार,ज्योती निकम,अश्विनी बर्डे, रजनी कुलकर्णी, सुवर्णा भोसलेआदि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केले तर आभार स्मिता कुलकर्णी यांनी मानले

,

- Advertisment -

ताज्या बातम्या