Thursday, April 25, 2024
Homeनगरआठ दिवसांत 5 नं. साठवण तलाव अंदाजपत्रक सादर करा

आठ दिवसांत 5 नं. साठवण तलाव अंदाजपत्रक सादर करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पाच नंबर साठवण तलावाचे

- Advertisement -

प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण झाले असून पुढील कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यासाठी येत्या आठ दिवसांच्या आत पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना दिल्या असून साठवण तलावाच्या पुढील कामासाठी चालना मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले काही दिवसांपूर्वी कोपरगाव दौर्‍यावर आले असता आमदार आशुतोष काळे यांनी त्यांची भेट घेऊन साठवण तलावाच्या पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी आमदार आशुतोष काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, संदीप वर्पे, धरमशेठ बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, डॉ.अजय गर्जे, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, प्रशांत वाबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सराफ, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे या बैठकीसाठी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक तातडीने करून ते अंदाजपत्रक आठ दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा त्वरित भरून पोलीस कुमक वाढवावी, अशी मागणी या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली.

आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. आमदार आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पाच नंबर साठवण तलावासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे निधी मिळवून हे काम लवकरच मार्गी लावतील याबाबत कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या