Friday, April 26, 2024
Homeनगरपाणबुडी चोरीचे सत्र थांबेना

पाणबुडी चोरीचे सत्र थांबेना

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्याच्या पठारभागात इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेईना. चिंचेवाडी पाठोपाठ आता घारगावमधूनही इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरुन नेल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांतून जोर धरु लागली आहे.

- Advertisement -

घारगाव गावांतर्गत असलेले करवंदवाडी येथील वैभव वसंत आहेर यांनी त्यांच्या विहिरीत इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार बसविलेली होती. सोमवारी (ता.22) रात्री दहा वाजेच्या पूर्वी अज्ञात चोरट्याने मोटार, केबल व वायररफ असा पंधरा हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. दुसर्‍या दिवशी हा प्रकार शेतकर्‍यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी वैभव आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुरनं.266/2021 भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तत्पूर्वी गेल्या दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने जांभुळवाडी गावांतर्गत असलेल्या चिंचेवाडी येथील शेतकरी भिवा राघू सोन्नर यांची साडेदहा हजार रुपयांची पाणबुडी मोटार लांबविली. यापूर्वी देखील याच परिसरातून चोरट्यांनी अनेक मोटारी लांबविल्या आहेत. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांसमोर नवे संकट उभे राहिल्याने पोलिसांनी वारंवार घडणार्या मोटार चोरीच्या घटना रोखण्यासाठी कडक पावले उचलावी, आणि संतप्त शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या