Saturday, April 27, 2024
Homeजळगावसुभाष चौक अर्बन सोसायटीत 23 कोटींचा अपहार

सुभाष चौक अर्बन सोसायटीत 23 कोटींचा अपहार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

सुभाष चौक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी, जळगाव या संस्थेत बेनामी ठेवी व त्याचे वेगवेगळ्या नावाने रुपांतर केले असून, 23 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी अजय ललवाणी यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार विशेष लेखा परिक्षक पी.एफ. चव्हाण यांची नियुक्ती करुन चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात सुभाष चौक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटीत बेनामी ठेवी व त्याचे वेगवेगळ्या नावाने रुपांतर केले आहे.

त्या ठेवीदारांपैकी किती ठेवीदार हे कर भरणारे आहे. व त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला. तो त्यांनी कुठल्या आधारे संस्थेत ठेवला याबाबतची चौकशी करण्यासाठी अजय ललवाणी यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तीन महिन्यांपुर्वी केली होती.

याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी 6 एप्रिल 2021 रोजी चौकशीसाठी विशेष लेखा परिक्षक पी.एफ.चव्हाण यांची नियुक्ती केली.

संस्थेचे टेस्ट ऑडीट करुन संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या