Thursday, April 25, 2024
Homeनगरतीन उपनिरीक्षकांच्या बदल्या

तीन उपनिरीक्षकांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैभव रूपवते व राहुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांची गडचिरोली परिक्षेत्र तर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांची नागपूर परिक्षेत्रामध्ये बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यांना अहमदनगर जिल्हा पोलीस घटकाच्या आस्थापनेवरून कार्यमुक्त करण्यात आल्याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या