Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारमोलगी येथे पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

मोलगी येथे पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

वर्दळीच्या ठिकाणी विना मास्क मोटरसायकलीवर ट्रीपल सिट फिरणार्‍या तरुणाला अडवल्याचा राग आल्याने पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस ठाण्यातच हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना मोलगी ता.अक्कलकुवा येथे घडली.

- Advertisement -

याप्रकरणी संबंधीत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास रघुनाथ प्रतापसिंग वसावे (24, रा.मोलगी) हा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करत तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क किंवा रुमान न लावता वर्दळीच्या ठिकाणी मोटरसायकलीवर ट्रीपल सिट फिरतांना आढळून आला.

त्याला पोलीसांनी अडविले असता त्याचा राग आल्याने त्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश उदयसिंग पाटील यांना शिवीगाळ करुन आरडाओरड करत शासकीय कामात अडथळा आणला.

त्याला मोलगी येथील पोलीस ठाण्यात आणले असता तेथेच पाटील यांची गच्ची पकडून शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी तोंडावर छातीवर मारहाण करुन शिवीगाळ केली.

याबाबत राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रघुनाथ वसावे याच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 353, 332, 504, 188, 269, आपत्ती व्यवस्थापन कलम 51 ब मोटर वाहन अधिनियम कलम 128, (1) 177 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 112 चे उल्लंघन 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या