Saturday, April 27, 2024
Homeनगरयांत्रिक ऊस तोडणीकरीता पाचटाचे वजन निश्‍चितीसाठी अभ्यासगट

यांत्रिक ऊस तोडणीकरीता पाचटाचे वजन निश्‍चितीसाठी अभ्यासगट

सुखदेव फुलारी

नेवासा –

- Advertisement -

यंत्राने ऊस तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन निश्चित करणेसाठी पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे शास्रज्ञ

डॉ. सुभाष घोडके यांचे अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास गटात नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीजचे मुख्य शेतकी अधिकारी रमेश कचरे व कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगरचे सरव्यवस्थापक मानसिंग तावरे यांचा समावेश आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या अभ्यास गटाची स्थापनेचा आदेश काढला आहे.

ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम (3) (3-) (खखख) मधील तरतुदीनूसार जास्तीत जास्त 1 क्विंटल ऊसामागे 1 किलो (1%) पाचट वजावट ग्राह्य धरण्याची तरतूद आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दि. 27 जानेवारी 2021 रोजीचे पत्राने मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबई, विस्मा (थखडच-) पुणे, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन, पुणे यांना ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी केल्यास जास्त पाचट येते व त्याचे वजावटीचे प्रमाण निश्चित करून मिळणेकरीता कळविले होते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याशी सल्ला मसलत करुन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करणेत आली आहे.

या अभ्यास गटाने काही साखर कारखाने व शेतकर्‍यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घ्यावीत. तसेच याबाबत कारखान्यांच्या शेती अधिकार्‍यांना प्रत्यक्ष शेतावर आलेले अनुभव, प्रगतीशील शेतकर्‍यांचे अनुभव, मत व क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष आलेली निरीक्षणे यांचा समावेश करून ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन निश्चित करणेकरीता अहवाल एप्रिल 2021 अखेर सादर करावा असे निर्देश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

मजुरांनी तोडणी केलेल्या उसाच्या वजनातून

मोळी बांधणी मटेरियल वजा करावयाची सवलत

साखर कारखाने शेतकर्‍यांच्या ऊसाच्या वजनातून मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन वजावट करतात. याबाबत अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी साखर आयुक्त कार्यालयाकडे येत असल्याने साखर आयुक्तांनी याबाबद दि.27 जानेवारी 2021 रोजी परिपत्रक काढून साखर कारखान्याना निर्देश दिलेले आहेत. मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन जास्तीत जास्त एक क्विंटल ऊसामागे 1 किलो (1%) वजावट केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा साखर (आयुक्त) यांचे मान्यतेने करावयाची कायदेशीर तरतूद असताना साखर कारखाने मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामग्रीचे 1% पेक्षा जास्त वजन ऊसाच्या वजनातून घट करतात अशी तक्रार करण्यात आलेली आहे. ही बाब विचारात घेता मोळी बांधणी वापरलेल्या सामग्रीचे वजन ऊसाच्या वजनातून घट करताना ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम (3)(3 ए)(3) नुसार कार्यवाही करावी असे निर्देश साखर आयुक्तांनी दिलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या