पाठ्यपुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार पुरवठादार करणार केंद्र शाळेवरती पुस्तके पोहच

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांची बालभारतीचे तालुकास्तरापर्यंत आणि तालुकास्तरावरून केंद्र स्तरापर्यंत वितरीत करण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षणाधिकारी यांना आदेश दिले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही पुस्तके मिळाली नव्हती ती पुस्तके लवकरच विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत.

समग्र शिक्षामधील मोफत पाठ्यपुस्तक योजनेत सन 2021-22 करीताच्या भांडारापासून तालुका स्तरावर आणि तालुका स्तरापासून केंद्रस्तरापर्यंत पाठयपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकाची वाहतूक लवकर सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने पाठ्यपुस्तक स्वाध्यायपुस्तिकांची वाहतूक विहित कालमर्यादिमध्ये पूर्ण करणे व पाठ्यपुस्तकांचे शाळा विद्यार्थ्यांना वितरण करण्याकरीता शिक्षण संचालक यांनी निर्देश दिले आहेत. बालभारतीचे भांडार ते तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तक व स्वाध्यायपुस्तिकांची वाहतूक केली जाणार आहे. शाळेमधील विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पाठ्यपुस्तकांची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडे नोंदविलेली आहे. अंतिम करून बालभारती यांचेकडे नोंदविण्यात आली आहे.

पाठ्यपुस्तक व स्वाध्यायपुस्तिकांची उचल करून तालुका/महानगरपालिका स्तरावर केली जाणार आहे. तालुक्यांना पुस्तके पाठविली जाणार आहेत. पावतीप्रमाणे पुस्तके घेण्याची कार्यवाही करून वाहतूकदारास पोहोच देण्यात यामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही याही दक्षता सुचित केला आहे. तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके सुस्थितीमध्ये राहतील याची दक्षता घ्यावी पाऊस, वारा अथवा नैसर्गिक आपतीमुळे पाठयपुस्तके खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावर उपलब्ध केंद्रनिहाय पुस्तकांची विभागणी करण्यात संबंधित केंद्रामध्ये असलेल्या पाठ्यपुस्तके वाहतुकदारामार्फत संबंधित केंद्र शाळेच्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे. संबंधित केंद्रातील पुस्तकाची केंद्रनिहाय विभागणी करून ठेवावी हा केंद्र शाळास्तरावर पोहोच करावयाच्या पाठ्यपुस्तकांची विभागणी पूर्ण झाल्यानंतर केंद्रनिहाय पाठ्यपुस्तक वितरणाचा वितरण आदेश वाहतूक संस्थेला दिले जाणार आहेत.

केंद्रावर प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांना पाठ्यपुस्तके केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये वितरीत करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करणेबाबत शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करून त्याची नोंद घेवून शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच दिवशी एकाच वेळी शाळा स्तरावर विद्यार्थी पालकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तालुका स्तरावर व शाळा स्तरावर पुस्तकांची विभागणी व वितरण करतेवेळी पुस्तकांची बांधणी व छपाई यामध्ये दोष आढळून आल्यास अशी पुस्तके प्रथम तालुका स्तरावर संकलित करण्यात यावीत व जिल्ह्यातील अशा पुस्तकांची तालुकानिहाय, माध्यमनिहाय, वर्गनिहाय व विषयनिहाय यादी तयार करून बालभारतीला कळवावे. सदर पुस्तके बदलून घेण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *